नेपाळमध्ये अडकलेल्या 340 यात्रेकरूंची सुटका 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

सिमिकोट येथून नेपालगंज आणि सुरखेत भागात 342 यात्रेकरूंना 21 विमानांच्या आणि दोन खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने हलविण्यात आले, असे भारतीय दूतावासाने ट्‌विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले.

काठमांडू : कैलास मानसरोवर यात्रेहून परत येताना खराब हवामानामुळे नेपाळच्या डोंगराळ भागातील सिमिकोट भागात अडकलेल्या 340 हून अधिक भारतीयांची आज सुटका करण्यात आली. विमान आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. या यात्रेकरूंना चांगल्या प्रकारची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी भारतीय सीमेजवळील नेपालगंज आणि सुरखेत या दोन गावांमध्ये नेण्यात आले आहे. 

सिमिकोट येथून नेपालगंज आणि सुरखेत भागात 342 यात्रेकरूंना 21 विमानांच्या आणि दोन खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने हलविण्यात आले, असे भारतीय दूतावासाने ट्‌विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. भारतीय दूतावासाच्या वतीने या यात्रेकरूंसाठी सुरकोट ते नेपालगंजसाठी बसची व्यवस्था केली आहे. तिबेटच्या सीमेवरील हिलसा येथून जवळपास सर्वंच यात्रेकरूंना हलविण्यात आल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: 340 pilgrims rescued from Nepal