Kerala Floods : केरळमध्ये मदतीसाठी 38 हेलिकॉप्टर, शेकडो बोटी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, की काही भागांमध्ये नागरिकांना एअरलिफ्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अजूनही हजारो नागरिक अडकलेले आहेत. संरक्षण मंत्र्यांशी आजच बोलणे झाले असून, त्यांनी आणखी हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

कोची : केरळमध्ये यंदाच्या शतकातील सर्वांत मोठी पूर आला असून, पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी तब्बल 38 हेलिकॉप्टर आणि शेकडो बोटी कार्यरत आहेत. या पुरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षिक ठिकाणी हलविण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग (एनडीआरएफ)चे सुमारे 1300 जवान मदतकार्यात आहेत. याबरोबरत हवाई, नौदल आणि लष्कराचे जवानही मदत कार्यात व्यस्त आहेत. मदतकार्यात असलेल्या 38 हेलिकॉप्टरपैकी काही हेलिकॉप्टरमधून पुरात अडकलेल्या नागरिकांनी खाद्यपदार्थही पुरविले जात आहेत. अनेक भागात छातीपर्यंत साचले आहे. त्यामुळे जवानांना बोटी अडकलेल्या नागरिकांना पोचवून तेथून सुरक्षितस्थळी त्यांना हलविण्यात येत आहे.

>hi

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, की काही भागांमध्ये नागरिकांना एअरलिफ्ट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. अजूनही हजारो नागरिक अडकलेले आहेत. संरक्षण मंत्र्यांशी आजच बोलणे झाले असून, त्यांनी आणखी हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: 38 Helicopters, Hundreds Of Boats Being Used For Rescue Ops In Kerala floods