कर्नाटक निवडणुकीतील 391 उमेदवारांवर गुन्हेगारी खटले

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

कर्नाटक निवडणुकीमधील भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या महत्वाच्या तीन पक्षाचे जवळपास 28% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. यामध्ये सर्वात जास्त  भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. भाजपच्या 224 पैकी 83 म्हणजेच जवळपास 37% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. 
 

बंगळूर - कर्नाटक निवडणुकीमधील भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या महत्वाच्या तीन पक्षाचे जवळपास 28% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. यामध्ये सर्वात जास्त  भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. भाजपच्या 224 पैकी 83 म्हणजेच जवळपास 37% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. 

याबाबतीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या 220 उमेदवारांपैकी 59 म्हणजेच 26% उमेदवारांवरती गुन्हेगारी खटले आहेत. याचबरोर कर्नाटक निवडणुकीत तिसरा महत्वाचा पक्ष जनता दल (सेक्युलर) हा आहे. या पक्षाने सुद्धा ते लढवत असलेल्या 199 पैकी 41 गुन्हेगारी खटले असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये भाजपच्या 58 उमेदवारांवर तर काँग्रेसच्या 32 आणि जनता दल (सेक्यलर) च्या 29 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

एडीआर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच, एकूण 2560 उमेदवारांपैकी 391 उमेदवारांवर गुन्हेगारी खटले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पसंती दाखवली आहे. परंतु, त्यामधून चांगल्या उमेदवाराला निवडून देणे हे मतदारांचे काम आहे असे मत एडीआआर संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख त्रिलोक शास्त्री यांनी व्यक्त केले.

Web Title: 391 candidates in fray face criminal charges