कुपवाड्यात चकमक; 4 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

कुपवाड्यामधील अरमपोरा भागात दहशतवाद्यांसाठी शोधमोहिम राबविली जात असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार केला. ही शोधमोहिम कालपासून राबविण्यात येत असून अद्यापी चकमक सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यामध्ये आज (बुधवार) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान आणि दोन पोलिस जवान हुतात्मा झाले. या चकमकीत अन्य एक जवान जखमी झाला. या चकमकीत चार दहशतवादीही ठार झाले.

कुपवाड्यामधील अरमपोरा भागात दहशतवाद्यांसाठी शोधमोहिम राबविली जात असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अचानक गोळीबार केला. ही शोधमोहिम कालपासून राबविण्यात येत असून अद्यापी चकमक सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आणखी माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

Web Title: 4 cops, Army jawans martyred in encounter in J&K's Kupwara