बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने चौघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

बिहार सरकारने राज्यात दारु बंदी केलेली आहे. तरीही दारूची सर्रास विक्री होत असल्याचे पहायला मिळत आहे. रविवारी रात्री बेगुसराय जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेले चौघेही मित्र होते.

बेगुसराय : बिहारमध्ये दारुबंदी असतानाच बेगुसराय जिल्ह्यातील पोखारिया गावात विषारी दारू प्यायल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बिहार सरकारने राज्यात दारु बंदी केलेली आहे. तरीही दारूची सर्रास विक्री होत असल्याचे पहायला मिळत आहे. रविवारी रात्री बेगुसराय जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेले चौघेही मित्र होते. रविवारी रात्री स्टेडियमध्ये दारू पिल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.

मृत्यू झालेल्या चौघांपैकी मनोज पासवान हा नेहमी दारुचे सेवन करणारा होता. तर, सोनू कुमार, सोनी कुमार आणि प्रवीण कुमार यांनीही त्याच्यासोबत दारु प्यायली. या घटनेची चौकशी करण्यात येत असून, दारु विक्रेत्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये 2016 मध्ये हूच घटनेची आठवण झाली. हुच येथेही विषारी दारु प्यायल्याने चौघांचा मृत्यू झाला होता.

Web Title: 4 dead after consuming spurious liquor in Begusarai in Bihar

टॅग्स