उरी सेक्टरमध्ये 'जैश'चे 4 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी हे सर्व दहशतवादी संबंधित होते. या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून, परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये भारतीय जवानांना चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. हे चारही दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत.

राज्याचे पोलिस महासंचालक शेष पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधील दुलांजा गावात लष्कराचे लष्कराचे जवान, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले. चारही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली. यांच्याकडील शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहे.

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी हे सर्व दहशतवादी संबंधित होते. या दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून, परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: 4 JeM terrorists killed by Indian armed forces in Uri