पाकिस्तानच्या अंदाधुंद गोळीबारात 4 मृत्यूमुखी, 23 गंभीर जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

बुधवारी (ता. 23) सकाळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे कठुआमधील हिरानगर भागात एका भारतीय नागरिकचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. याशिवाय सीमारेषेवरील भागात तीन जणांचा गोळीबारात मृत्यू झाला असून, 23 जण गंभीर जखमी आहेत.

कठुआ (जम्मू-काश्मिर) : गेले तीन ते चार दिवस भारत पाकिस्तानच्या सीमारेषेवर चालू असलेली चकमक आजही चालूच राहिली. बुधवारी (ता. 23) सकाळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे कठुआमधील हिरानगर भागात एका भारतीय नागरिकचा मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी आहेत.

याशिवाय सीमारेषेवरील भागात तीन जणांचा गोळीबारात मृत्यू झाला असून, 23 जण गंभीर जखमी आहेत. पाकिस्तानच्या या अंदाधुंद गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. 

bsf firing

जम्मू-काश्मिरच्या हिरानगर, संबा, कठुआ, आरएसपुरा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाने दिल्या आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या गोळीबारात एक 70 वर्षीय वयोवृद्ध महिला व आठ महिन्यांचे बालक मृत्यूमुखी पडले.

मंगळवारी रात्रीपासून सीमेवरील 40 लष्करी चौक्यांमधील जवान हे पाकिस्तानी गोळीबाराला तोंड देत आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जावान आहेत. या गोळीबारामुळे घरांची पडझड झाली आहे. यामुळे गावातील लोकांना सरकारी शिबिरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

यामुळे गोळीबारामुळे परिसरातील शाळा, दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. 

Web Title: 4 killed and 23 injured in pakistan heavy firing