शोपियाँत दहशतवादी हल्ल्यात 4 पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (बुधवार) दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (बुधवार) दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा गावात पोलिस उपअधीक्षक यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले असून, अन्य काही जण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. दहशतवाद्यांचा परिसरात शोध घेण्यात येत आहे.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईत अल्ताफ अहमद उर्फ अल्ताफ कचरू याच्यासह अन्य एका हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिसांमध्ये इश्फाक अहमद मीर, जावेद अहमद भट्ट, मोहम्मद इक्बाल मीर आणि अदिल मंजूर भट्ट यांचा समावेश आहे.

Web Title: 4 police dies in terrorist attack in shopiya