सियाचीनमध्ये हिमस्खलनात चार जवानांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सियाचीनच्या उत्तर भागात हिमस्खलन होऊन लष्कराच्या डोग्रा रेजिमेंटचे चार जवान आणि दोन हमाल मृत्युमुखी पडले. काल (ता.18) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

नवी दिल्ली : सियाचीनच्या उत्तर भागात हिमस्खलन होऊन लष्कराच्या डोग्रा रेजिमेंटचे चार जवान आणि दोन हमाल मृत्युमुखी पडले. काल (ता.18) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तब्बल 19 हजार उंचीवर लष्कराचे आठ जणांचे पथक एका ठाण्यावरून दुसरीकडे जात असताना दुपारी तीन वाजता अचानक हिमस्खलन होऊन हे पथक बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले. अनेक तास बर्फाखाली अडकून राहिल्याने गारठून यातील चार जवान आणि दोन हमालांचा मृत्यू झाला, असे लष्करातील सूत्रांनी सांगितले. 

जिंदगी मे कुछ पाना हो तो... : संजय राऊत

हिमस्खलनाबाबत माहिती मिळाल्यानंतर लष्कराने तातडीने बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने बर्फाच्या ढिगाऱ्याखालून सर्व आठ जणांना बाहेर काढले. त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर होती. या सर्वांना नजीकच्या लष्करी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही चार जवान आणि दोन हमालांना वाचविण्यात यश आले नाही. या घटनेमुळे सियाचीन भागात गस्तीवर असलेल्या जवानांना कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत; शिवसेनेचे थेट आव्हान

जगातील सर्वाधिक उंचीवर युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तापमान उणे 60 अंशांपर्यंतही घसरते. फेब्रुवारी 2016 मध्ये सियाचीनच्या उत्तर भागातच मद्रास रेजिमेंटचे दहा जवान हिमस्खलनात अडकले होते. 1984 पासून सियाचीनमध्ये भारताच्या एक हजाराहून अधिक जवानांचा मृत्यू झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 soldiers martyard in siachen yesterday

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: