जुन्या नोटा बाळगल्यास 4 वर्षे तुरुंगवास, वटहुकूम मंजूर

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : जुन्या नोटांबाबतच्या वटहुकूम केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. यानुसार, 31 मार्चनंतर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा कोणी जवळ बाळगल्याचे आढळून आल्यास त्या व्यक्तीला चार वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. 

तसेच, जुन्या नोटांची देवाण-घेवाण केल्यावरून पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूदही करण्यात आली आहे. दहापेक्षा जास्त जुन्या नोटा सापडल्यास त्यावर दंड आकारण्यात येणार आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 50 हजार रुपये किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम यापैकी जो आकडा मोठा असेल तेवढा दंड भरावा लागेल अशी शक्यता आहे. 

तसेच, 31 मार्चनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना रिझर्व्ह बँक त्या नोटांचे मूल्य देणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने 80 हून अधिकवेळा नियम बदलले असल्याने नागरिकांना रोज नव्या नियमांशी तडजोड करीत नोटाटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. 

Web Title: 4 years term for holding old notes, demonetisation ordinance passed