स्वेच्छानिवृत्तीसाठी ४० हजार जणांचे अर्ज

पीटीआय
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

आर्थिक अडचणीत असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (बीएसएनएल)े जाहीर केलेल्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. दोन दिवसांपूर्वी बीएसएनएलने ही योजना जाहीर केली होती, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नवी दिल्ली - आर्थिक अडचणीत असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (बीएसएनएल)े जाहीर केलेल्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. दोन दिवसांपूर्वी बीएसएनएलने ही योजना जाहीर केली होती, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  

बीएसएनएलचे सुमारे एक लाख कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्‍यता आहे. यामुळे वेतनावरील ७,००० कोटी रुपयांच्या खर्चाची बचत कंपनी करू शकणार आहे. केवळ दोन दिवसांच्या कालावधीतच ४० हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. सुमारे ७७ हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेतील, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40000 form for VRS in BSNL Company