भयंकर थंडीमुळे उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या काही भागात वीजांच्या गडगडासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर भारतात थंडीच्या प्रकोपामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : थंडीच्या प्रकोपामुळे उत्तरप्रदेशात तब्बल 41 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे आणि त्यामुळेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर भारतात दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, पंजाब, मध्य प्रदेश या सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वी देशातील आठ राज्यांत 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे. 

कानपूर, उन्नाव आणि जालौनमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तरप्रदेशातील इटावामध्ये 4.8 डिग्री तर बांदामध्ये 5.4 अशा सर्वाधिक कमी तापामानाची नोंद झाली. उत्तरप्रदेशात कानपूरमध्ये 17, कानपूर देहातमध्ये 5, झाशीत 4, बांदा आणि महोबामध्ये प्रत्येकी 3, हाथरस, आग्रा आणि हमीरपूरमध्ये प्रत्येकी 2 तर कन्नौज, चित्रकूट आणि अलीगढमध्ये प्रत्येकी एका माणसाचा थंडीने मृत्यू झाला आहे. 

Image result for uttar pradesh cold wave images

शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या काही भागात वीजांच्या गडगडासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर भारतात थंडीच्या प्रकोपामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 people died in Uttar Pradesh due to extreme cold