43 जणांची ओळख पटली 

Railway_Accident_
Railway_Accident_


संध्याकाळपर्यंत 110 मृतदेह हाती लागले होते. त्यापैकी 43 जणांची ओळख पटविण्यात यश आले आहे. मृत्युमुखी पडलेल्यांत 20 जण उत्तर प्रदेशातील, 15 जण मध्य प्रदेशातील आणि सहा जण बिहारचे नागरिक आहेत. महाराष्ट्रातील एका नागरिकाचा मृतांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले. एकूण 27 मृतदेहांचे छवविच्छेदन पूर्ण करण्यात आले असून, ते संबंधितांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले आहेत. मृतदेहांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पुरविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवान प्रभूनारायण सिंह, 'बीएसएफ'चे जवान अनील किशोर (बिहार) आणि उत्तर प्रदेश पोलिस दलातील कॉन्स्टेबल लखन सिंह (झासी) यांचा मृत्युमुखी पडलेल्यांत समावेश असल्याचे सांगण्यात आले. 

मदतीचा ओघ 
- केंद्र सरकार ः मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये; तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये 
- उत्तर प्रदेश सरकार ः मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये आणि किरकोळ जखमींना 25 हजार 
- मध्य प्रदेश सरकार ः मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये; तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये 
- रेल्वे मंत्रालय ः मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना 2 ते साडेतीन लाख रुपयांच्या दरम्यान मदत 

अपघाताची चौकशी होणार 
- रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून अपघाताची चौकशी करण्यात येणार 
- कानपूर ते झांशी दरम्यानच्या संपूर्ण रेल्वे मार्गाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार 
- अपघातग्रस्त रेल्वे गाडीतील तिकीट तपासनीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांबद्दल माहिती मिळालेली नाही 
- कानपूर ते झाशी रेल्वेमार्ग 36 तासांत वाहतुकीसाठी खुला केला जाणार 
- दुरुस्तीच्या कामासाठी तीनशे अभियंते आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

- रेल्वे राज्यमंत्री जयंत सिन्हा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांची घटनास्थळी भेट 
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही घटनास्थळी जाणार 
- मदतकार्यात गॅस कटरचा कमीत कमी उपयोग करण्यावर भर 
- त्याऐवजी कोल्ड कटरचा वापर करणार 
- अपघात झाला त्या भागातील रस्त्यांची दुरवस्था 
- त्यामुळे अपघातस्थळी मदत पथके पोचण्यास तब्बल एक तास लागला 
- एस-3 आणि एस-4 डब्यातील प्रवाशांना किरकोळ इजा 
- कानपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर अपघात 
- लोहमार्गाला तडे गेल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज 
- स्टेनलेसस्टीलचे 'एलएचबी' डबे नसल्याने मृतांची संख्या वाढली 

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा शोक शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा आहे. आमच्या प्रार्थना जखमी लोकांसोबत असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली असून गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबाबत मला तीव्र दु:ख आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. 
- राजनाथसिंह, गृहमंत्री 

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी संपूर्ण देश एकतेने उभा राहील. मदत आणि बचावकार्य प्रभावीपणे हाती घेण्यात आले असून, यामुळे अनेकांचे प्राण वाचतील अशी आशा आहे. 
- सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com