Corona Update : देशात 87 लाखांहून अधिक लोक बरे झाले; तरीही धाकधूक कायम!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

कोरानाग्रस्तांची संख्या, सक्रिय रुग्ण आणि रिकव्हरी रेट या सर्वातच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मागील 24 तासांत राज्यात  6,406 नवे रुग्ण आढळले आहेत.

देशासह जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची धास्ती अद्यापही कायम आहे. दिवसागणित बदलणारे आकडे हे दिलासा देताना दिसत नाहीत. मागील 24 तासांत देशात 43 हजार नवे रुग्ण आढळले असून 492 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा  93,09,788 वर जाऊन पोहचलाय. सध्याच्या घडीला 4,55,555 लोक कोरोनाबाधित असून 24 तासांत 39,379 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आकडेवारीसह कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा हा  87,18,517 इतका झालाय. 

कोरोनाची लाट थोपविण्यासाठी दिल्लीत रात्रीच्या संचारबंदीची तयारी

मागील 24 तासांमध्ये 33 हजार रुग्ण बरे झाले आहेत. या आकडेवारीनंतर कोरोनातून स्वस्थ झालेल्या रुगांचा एकूण आकडा  87.11 लाख इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीचा दर 4.90 टक्के असून मृत्यू दर हा 1.46 टक्के इतका आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशात भारत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा जवळपा 1.28 कोटींच्या घरात आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतात  38.86 लाखांहून कमी केसेस आहेत.  

गुजरातमधील कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत आग; 5 रुग्णांनी गमावला जीव

कोरानाग्रस्तांची संख्या, सक्रिय रुग्ण आणि रिकव्हरी रेट या सर्वातच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मागील 24 तासांत राज्यात  6,406 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्ण वाढीसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 18 लाखांपेक्षा अधिक झाला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाची धास्ती वाढली आहे. मागील 24 तासांत देशाच्या राजधानीत  5,475 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या आकडेवारीनंतर दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा  5.51 लाखवर पोहचली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43082 new COVID19 infections Indias total cases rise to 93 09 788 With 492 new deaths