चीन सीमेनजीक बांधणार  44 महत्त्वाचे रस्ते

पीटीआय
सोमवार, 14 जानेवारी 2019

नवी दिल्ली : व्यूहात्मकदृष्टीने महत्त्वाचे असे 44 रस्ते चीन सीमेवर बांधणार असल्याचे भारताच्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. चीन सीमेप्रमाणेच पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाब आणि राजस्थानमध्येही 2100 किमी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. 

बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी त्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, आपत्कालीन परिस्थितीत चीन सीमेवर लष्कराला तातडीने हालचाल करण्यास उपयुक्त अशा 44 रस्त्यांची निर्मिती करण्यास सरकारने बांधकाम विभागाला सांगितले आहे. या रस्तेबांधणीसाठी साधारणपणे 21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश ते जम्मू-काश्‍मीरपर्यंत जवळपास चार हजार किलोमीटर लांबीची सीमा आहे. या रस्तेबांधणीच्या प्रकल्पांना सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चीनदेखील या सीमेनजीकच्या रस्ते आणि इतर प्रकल्पांना प्राधान्य देत आहे. याशिवाय पाकिस्तान सीमेनजीक पंजाब आणि राजस्थानमध्येही उभ्या-आडव्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार असून, त्यासाठी साधारणपणे 5,400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

Web Title: 44 important roads to build China border