उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 44 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50 हजार मदतीची घोषणा करण्यात आली आहे. बस 60 फूट दरीत कोसळल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

रामनगर : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील नैनिदंडाजवळ पिपली-भोआन मार्गावर आज सकाळी हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफचे जवान बचावासाठी दाखल झाले. रामनगरहून भोआनकडे ही बस जात होती. अपघातामागील नेमके कारण समजू शकले नाही. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांनी अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50 हजार मदतीची घोषणा करण्यात आली आहे. बस 60 फूट दरीत कोसळल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही. 

Web Title: 44 Killed After Bus Falls Into Gorge In Uttarakhands Pauri Garhwal