उना दलित अत्याचार; पिडीतांसह 300 दलितांनी हिंदू धर्म सोडला

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

उना- दोन वर्षांपूर्वी झालेल्या उना येथील दलित अत्याचार प्रकरणातील पिडीतांसह जवळपास 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग केला. दलित असल्यामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला. 

2016 साली गुजरातमधील ऊना येथे 'गोमाता रक्षक गटा'कडून मृत गायीचे कातडे काढण्यावरून सरवैया या दलित कुटूंबातील चार जणांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. दोन वर्षानंतरही न्याय न मिळाल्याने सरवैया कुटूंबातील 45 सदस्यांसह 300 दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारला. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी काल(रविवारी) बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.

सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही तसेच आमच्यावर अत्याचार करणारे आरोपी अजुनही जामिनावर बाहेर आहेत, दोन वर्षानंतरही आम्हाला न्याय मिळालेला नाही असा आरोप कुटूंबियांनी केला.

Web Title: 45 family members of Una flogging victims embrace Buddhism