पंजाबमध्ये 4.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

संगरूर (पंजाब)- संगरूर - पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथे पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या दोन हजार व शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

बनावट नोटा छापून चार जणांची टोळी त्यांचा पुरवठा संगरुरमधील सहा जणांना करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी या चार जणांना अटक केली. हरभजन दास, जसबीरसिंग, जयदेव आणि भगवान दास अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन हजार व शंभर रुपयांच्या साडेचार लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. तसेच, प्रिंटर, स्कॅनर, संगणक आणि मोटार जप्त करण्यात आली आहे.

Web Title: 4.5 lakh fake currency seized in Punjab