'ऑपरेशन कमळ'साठी 450 कोटींचे आमिष

'ऑपरेशन कमळ'साठी 450 कोटींचे आमिष

नवी दिल्ली/ बंगळूर : कर्नाटकात घटनात्मकरीत्या अधिकारावर आलेल्या कॉंग्रेस व धजद युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालपदाचा वापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. नवी दिल्ली येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या 20 आमदारांना 450 कोटींचे आमिष दाखविण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणजितसिंग सुरजेवाला, कॉंग्रेसचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव आदी नेते संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित होते. ते म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपचे प्रदेशाध्याक्ष बी. एस. येडियुरप्पा हे नेते कर्नाटकात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी राज्यपालपदाचा वापर करीत आहेत. पुढील आठवड्यात हा विषय संसदेत उपस्थित करण्यात येणार आहे.'' 
धजदचे आमदार नागनगौड कंदकोर यांना भाजपमध्ये ओढण्यासाठी विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांनी प्रयत्न केल्याची एक चित्रफीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शुक्रवारी जाहीर केली आहे. तीच चित्रफीत पुन्हा जाहीर केली. भाजप नेत्यांना घटनेबद्दल आदर नाही.

आमदारांच्या घोडेबाजारासाठी वापरण्यात येणारा पैसा काळा की गोरा, याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, सीबीआयमार्फत चौकशी करणे योग्य होईल, येडियुरप्पा यांनी प्रत्येक आमदाराला 10 कोटी रुपयांचे आमिष दाखविल्याचे ध्वनिफितीमध्ये आहे. 20 आमदारांना खरेदी करण्यासाठी अशाप्रकारचे आमिष दाखविल्याचे ध्वनिफितीमधून स्पष्ट होते. ही रक्कम सुमारे 450 कोटी रुपयांच्या घरात जाते, असा आरोप त्यांनी केला. 

सरन्यायाधीशांनी चौकशी करावी 

"कॉंग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरविल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हाताशी धरून आपल्या बाजूने निकाल मिळविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करतील,' असे येडियुरप्पा यांनी दिलेले आश्वासन ध्वनिफितीमध्ये असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. भाजपचे वरिष्ठ नेते न्यायालयाची बाजू सांभाळून घेतील, असे येडियुरप्पांनी दिलेले आश्वासन ध्वनिफितीमध्ये असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी स्वयंप्रेरणेने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com