राजस्थानातील मुसळधार पावसात 5 बालकांसह 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

भरतपूर येथे या मुसळधार पावसात पाच जणांचा मृत्यू झाला तर धोलपूर येथे घराची भींत कोसळून यातील अन्य काही जणांचा मृत्यू झाला. याबाबत भरतपूरचे विभागीय आयुक्त सुबीर कुमार यांनी सांगितले, की धोलपूरचे जिल्हाधिकारी आणि भरतपूर यांना झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पाठवले आहे.

भरतपूर : राजस्थानामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 5 बालकांचा समावेश आहे. राजस्थानातील धोलपूर आणि भरतपूर या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील पाच जण हे भरतपूर येथील रहिवासी आहेत तर अन्य काही धोलपूर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

RAJASTHAN RAIN

भरतपूर येथे या मुसळधार पावसात पाच जणांचा मृत्यू झाला तर धोलपूर येथे घराची भींत कोसळून यातील अन्य काही जणांचा मृत्यू झाला. याबाबत भरतपूरचे विभागीय आयुक्त सुबीर कुमार यांनी सांगितले, की धोलपूरचे जिल्हाधिकारी आणि भरतपूर यांना झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पाठवले आहे. तसेच भरतपूर जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार गुप्ता यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली.

विश्वंभर सिंग, कमला देवी, अरूण सिंग, राम श्रीदेवी आणि योगेश कुशवाहा अशी भरतपूरमध्ये मृत झालेल्यांची नावे आहेत. तर धोलपूर येथे पाच जणांचा मृत्यू झाला असून, पूनम, मनिषा, मतलाना, तिचा भाऊ शक्ती आणि मुकेश कुशवाह यांच्यासह सुमन देवी आणि गुड्डी देवी यांचा मृत्यू झाला. या सर्वांचा मृत्यू हा घराची भींत कोसळल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: 5 children among 12 dead in heavy rain in Rajasthan