पश्‍चिम बंगालमध्ये वीज कोसळून पाच ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यांमुळे वीज कोसळून पाच जण ठार झाले, तर एक जण वाहून गेला, अशी माहिती राज्याच्या आपत्ती निवारण अधिकाऱ्याने दिली.
 

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यांमुळे वीज कोसळून पाच जण ठार झाले, तर एक जण वाहून गेला, अशी माहिती राज्याच्या आपत्ती निवारण अधिकाऱ्याने दिली.

पुरुलिआ जिल्ह्यातील भोमरागोरा गावात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण हे राजेंद्रपूरच्या बसिरहट ब्लॉक दोनमध्ये आणि 24 परगणा जिल्ह्यातील केउतेपारा येथे वीज कोसळल्याने मरण पावले, असे त्यांनी सांगितले.

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील छापरा गावातील बसंती ब्लॉकमध्ये एक महिला, तर उत्तर चंदनपिरी गावातील नामखाना भागात एक पुरुष वीज कोसळल्यामुळे मरण पावला. त्याशिवाय कूच बिहार जिल्ह्यातील मेखीलीगंज येथे सुतुंगा नदीत एक जण वाहून गेला, असे राज्य आपत्ती निवारण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: 5 dead in storm, lightning in West Bengal

टॅग्स