अमरनाथ यात्रेत दरड कोसळून 5 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

जम्मू : दरवर्षीप्रमाणे 27 जून रोजी अमरनाथ यात्राला सुरूवात झाली. परंतु, बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी दरड कोसळली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले. 

अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरुंचा एक ताफा बलाटल मार्गे रवाना झाला होता. परंतु, या मार्गावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना 28 जून रोजी लष्कराकडून  बलाटल बेस कॅम्पलाच थांबवण्यात आले होते. याच परिसरात पाऊस थोडा कमी झाल्यावर अमरनाथच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरुंच्या ताफ्यावर काल (मंगळवार) दरड कोसळली. दरम्यान बचाव पथक वेळीच जागी पोचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. 

दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया पाहता यंदा लष्कराने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केला आहे.

Web Title: 5 dies in landslide in amarnath yatra