नक्षलवादविरोधी कारवाईवेळी बॉम्बस्फोट; 5 जवान जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

रांची- जंगली भागात नक्षलवादविरोधी कारवाई सुरू असताना एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये पाच जवान जखमी झाले.  

माओवादी हिंसाचाराने ग्रासलेल्या छत्तीसगढ आणि झारखंडच्या सीमेवरील लातेहार जिल्ह्यातील जंगलामध्ये ही नक्षलवादविरोधी कारवाई करण्यात येत होती. 
लातेहार जिल्हा आणि गरवा जिल्हा आणि शेजारी राज्य छत्तीगढच्या सीमा ज्या ठिकाणी मिळतात त्या 'बुरा पहार' भागात CRPFच्या 'कोब्रा' तुकडीच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात येत होती, त्यावेळी ही घटना घडली. 

"गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने पाच जवान जखमी झाले आहेत. त्यामध्ये CRPFचे दोन सहायक निदेशक आणि एका जवानासह झारखंडचे पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत. माओवाद्यांविरोधातील मोहिमेवर हे पथक गेले होते," असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
Web Title: 5 jawans injured in ied blast in latehar