Ayodhya Verdict : 'हे' आहेत अयोध्येचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश!

वृत्तसंस्था
Saturday, 9 November 2019

सरन्यायाधीश रंजन गोगोई व त्यांच्या घटनापीठाने अयोध्येचा ऐतिहासिक निर्णय दिला. या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात नक्की कोणकोणते न्यायाधीश होते, त्यांचे या निकालात काय योगदान होते? बघू... 

नवी दिल्ली : अयोध्येचा बहुचर्चित ऐतिहासिक निकाल आज (ता. 9) लागला. रामजन्मभूमीची 2.77 एकर जमीन ही रामलल्लाला मिळाली. तर सुन्नी वक्फ बोर्डाला इतरत्र ठिकाणी 5 एकर जमिन मंजूर करण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई व त्यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात नक्की कोणकोणते न्यायाधीश होते, त्यांचे या निकालात काय योगदान होते? बघू... 

आता तरी राजकारणासाठी रामाचा वापर थांबेल : काँग्रेस

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली सलग 40 दिवस चाललेल्या या सुनावणीनंतर 17 ऑक्टोबरला निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई या घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यांच्याशिवाय न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस. अब्दुल नजीर, यांचा समावेश होता.

न्यायालयात बाजू मांडत होता रामाचा नेक्स्ट फ्रेंड 

सरन्यायाधीश रंजन गोगोई 
रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश आहेत. तसेच अयोध्या प्रकरणी तयार करण्यात आलेल्या घटनापीठाचे अध्यक्षदेखील आहेत. सरन्यायाधीपदावर असताना निवडणूक ते आरक्षण सुधारणा यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या निर्णय प्रक्रियेत रंजन गोगोई होते. 

Image result for Ranjan Gogoi ayodhya case

न्यायाधीश शरद बोबडे
शरद बोबडे हे सध्या चर्चेत असलेले नाव! सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून मराठमोळ्या शरद बोबडेंची नियुक्ती होईल. अयोध्या प्रकराणातील घटनापीठात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 47वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेतील. यापूर्वी बोबडे मध्यप्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. 

आज बाळासाहेब असते तर, राज ठाकरेंना झाली आठवण 

Image result for sharad bobde

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड
13 मे 2016मध्ये डी. वाय. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हे माजी सरन्यायाधीश होते. खासगीपणाचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार अशी घोषणा करणाऱ्या 9 सदस्यांच्या घटनापीठात त्यांचा समावेश होता.

Image result for d y chandrachud

न्यायाधीश अशोक भूषण 
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रूजु होण्यापूर्वी अशोक भूषण अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यानंतर काही काळ केरळ उच्च न्यायालय व 2016 पासून मुख्य न्यायाधीश म्हणून अशोक भूषण कार्यरत आहेत. 

Image result for ashok bhushan

न्यायाधीश एस. अब्दुल नजीर
अयोध्या निकाल प्रकरणाच्या घटनापीठात न्यायाधीश अब्दुल नजीर हे सदस्य होते. 1983 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली. 2003 मध्ये त्यांची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती झाली व त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रूजु झाले.   

Image result for abdul najir


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 justice who gaves historical Ayodhya Verdict