जम्मू काश्मीरात भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कॅबचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले. ही कॅब येथील गुरेझला जात असताना कॅबचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दु्र्घटना घडली.

बंदीपोरा : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कॅबचा आज (रविवार) भीषण अपघात झाला. कॅबचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात जम्मू काश्मीरातील बंदिपोरा जिल्ह्यात झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कॅबचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले. ही कॅब येथील गुरेझला जात असताना कॅबचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दु्र्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना जम्मू काश्मीरातील बंदिपोरा येथे घडली. 
 

Web Title: 5 killed in J and K accident