भारताचा मोठा स्ट्राईक; पाकच्या पाच सैनिकांचा खात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने मोठी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या 5 सैनिकांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

श्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने मोठी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या 5 सैनिकांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

सर्जिकल स्ट्राईकनंतरची ही भारतीय लष्कराने केलेली मोठी कारवाई आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकिस्तानच्या या कारवायांना भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

पुँछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना कंठस्नान घातले. यासोबतच पाकचे 12 बंकर्सही उद्धवस्त केले आहेत, याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार आहे, असेही सिंग यावेळी म्हणाले.

Web Title: 5 Pakistani Soldiers Killed, Confirms Indian Army As India Retaliates To Ceasefire Violation