तंगधर सेक्टरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

शोधकार्याच्या शेवटच्या टप्प्यात श्वान व मेटल डिटेक्टर यांत्राच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. 'दहशतवाद्यांचा हा कट उधळल्याने भविष्यातील अनेक दुर्दैवी घटना रोखण्यात जवानांना यश आले, तसेच जम्मू-काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा कट उधळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.' 

जम्मू-काश्मिर : जम्मू-काश्मिरच्या तंगधर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी आज (ता. 26) पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे दहशतवादी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एसओसी) ओलांडून भारतात येण्याच्या प्रयत्नानत होते, त्याचवेळी त्यांचा हा घुसखेरीचा कट जवानांनी उधळला व त्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. तंगधर सेक्टर हा उत्तर काश्मिरमधील संवेदनशील कुपवाडा या जिल्ह्यात आहे. या चकमकीनंतरही त्या भागात शोधकार्य चालूच राहिले, असे कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.  

Jammu and Kashmir encounter

शुक्रवारीच (ता. 25) दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती हाती आल्यानंतर भारतीय जवान व जम्मू-काश्मिर पोलिस यांनी तंगधर भागात शोधकार्य सुरू केले होते. रांबान जिल्ह्यातील कालिमस्ता (गुल) जंगलात शोध घेतल्यानंतर सोबत दारूगोळा व शस्त्र घेऊन असलेले दहशतवादी जवानांना सापडले. जवानांनी एके-56 रायफल, एके-56 मॅगझिन, 126 फैरी असलेला 7.62 मिमीचा दारूगोळा, एक 303 रायफल, एक 303 चे 7.63 मिमी मॅगझिन, स्टार पिस्तूल, ग्रॅनेड, हॅंड ग्रॅनेड अशा प्रकारचा दारूगोळा दहशतवाद्यांकडून जप्त केला.  

शोधकार्याच्या शेवटच्या टप्प्यात श्वान व मेटल डिटेक्टर यांत्राच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला. 'दहशतवाद्यांचा हा कट उधळल्याने भविष्यातील अनेक दुर्दैवी घटना रोखण्यात जवानांना यश आले, तसेच जम्मू-काश्मिरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा कट उधळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.' 

Web Title: 5 terrorist killed in Tangdhar sector of jammu kashmir by border security force