गुजरातेत भजनाच्या कार्यक्रमात उधळले 50 लाख

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

वलसाड, गुजरात : येथील पारंपारिक लोकसंगिताच्या कार्यक्रमात भजन गाणाऱ्या गायकावर तब्बल 50 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. जळाराम मानव सेवा ट्रस्ट, या धर्मादाय संस्थेसाठी निधी गोळा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून गावासाठी रुग्णवाहिका खरेदी करायची आहे.

कलवाडा गावचे सरपंच आशीष पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमला हजारो नागरिक उपस्थित होते. प्रसिद्ध लोक गायिका गीता राबर आणि ब्रीजराजदान गाधवी यांच्यावर 10, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उधळण्यात आल्या. ही रक्कम तब्बल 50 लाख रुपये एवढे आहे. 2016 मध्ये वलसाड जिल्ह्यातील नवसारी गावात झालेल्या अशाच एका कार्यक्रमात 40 लाख रुपये उधळण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमाची चर्चा देशभर झाली होती.

Web Title: 50 lakh Showering of money in Gujrat