उत्तरप्रदेश पोलिसांसाठी आज खास दिवस; आणखी एका गुंडाचा खात्मा

50 Thousand Prize Panna Yadav Killed In Bahraich STF Encounter
50 Thousand Prize Panna Yadav Killed In Bahraich STF Encounter

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह ८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा करण्यात आला. परंतु त्याच्यासोबत उत्तरप्रदेश पोलिसांनी आणखी एका गुंडाचा खात्मा केला आहे. या गुंडाच्या डोक्यावर ५० हजारांचे बक्षिसही होते. याबात पोलिसांनी आज माहिती दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अपर पोलिस महानिर्देशक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपुरमध्ये राहणारा पन्ना यादव उर्फ सुमन यादव याचा हरदी भागातील अहिरनपुरवा गावात स्थानिक पोलिसांनी खात्मा केला आहे. स्थानिक पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता, परंतु, त्यावेळी झालेल्या चकमकीत यादवचा पोलिसांनी खात्मा केला आहे. यादव हा कानपुरचा राहणारा होता. त्याच्यावर खून, मारामारी आणि दरोडा यासारख्या गंभीर गु्न्ह्यात तो आरोपी होता.
-------------
विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....
-------------
विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न अनुत्तरितच !
-------------
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरला. आज (ता. १०) उत्तरप्रदेश पोलिसांनी दोन मोठ्या गुंडांचा खात्मा केला. उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह ८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा केला. त्यानंतर यादवचा खात्मा केल्याने उत्तरप्रदेश पोलिसांसाठी आजचा दिवस खास ठरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल स्टास्क फोर्स (एसटीएफ) च्या वाहनातून विकास दुबेला मध्य प्रदेशमधून कानपुरच्या दिशेने नेत असताना वेगाने असणारी गाडी (ज्यात विकास दुबेला बसवण्यात आले होते) अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये विकास दुबेसह वाहनातील काही जवानही जखमी झाले. या अपघातातून सावरत असतानाच मोक्याचा फायदा उठवत विकास दुबेने एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर जवान आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. एसटीएफने विकासला पिस्तूल खाली ठेवत सरेंड होण्याची सूचना दिली. मात्र विकास दुबेने याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com