नोटांचा प्रवास मोरारजीभाई ते नरेंद्रभाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, 8 नोव्हेंबरला नेमकी हीच घोषणा केली आणि पाचशे व हजार रूपयांच्या नोटा रात्रीत व्यवहारातून बाद ठरविल्या. त्याचे पडसाद मंगळवारच्या रात्रीपासून उमटायला लागले आहेत. 

16 जानेवारी 1978 रोजी मंगळवार होता. तत्कालिन मोरारजी देसाई सरकारने राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्या मार्फत वटहुकूम काढला आणि एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रूपयांच्या नोटा रद्दबातल ठरविल्या. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण तेव्हा संसदेचे विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. शंभर रूपयांच्या नोटाही रद्द करायला हव्या होत्या, असे त्यांनी म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, 8 नोव्हेंबरला नेमकी हीच घोषणा केली आणि पाचशे व हजार रूपयांच्या नोटा रात्रीत व्यवहारातून बाद ठरविल्या. त्याचे पडसाद मंगळवारच्या रात्रीपासून उमटायला लागले आहेत. 

या पार्श्वभूमीवर, 'सकाळ'च्या 17 जानेवारी 1978 च्या अंकाची कव्हर स्टोरी म्हणजे 38 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यासारखे आहे. चलनी नोटा रद्द करण्याचा तेव्हाचा निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच निर्णय होता. त्या निर्णयासाठीची तातडीची बैठक तत्कालिन पंतप्रधान मोरारजीभाईंनी संध्याकाळीच बोलविली होती. बैठकीनंतर एकाही अधिकाऱयाने अथवा मंत्र्याने माध्यमांसमोर निर्णयाची वाच्यता केली नाही. रात्री नऊ वाजता आकाशवाणीवरून हा निर्णय 16 जानेवारी 1978 रोजी घोषित केला होता. 

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दलचे 'सकाळ'मधील 17 जानेवारी 1978 च्या अंकाचे पहिले पान आवर्जून वाचण्यासारखे आहे. 

'सकाळ'चे 20 जुलै 1969 चे पहिले पान भारताच्या आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्वाचा मानला गेलेल्या, बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाचे सविस्तर वार्तांकन करणारे आहे. 19 जुलै 1969 रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चौदा प्रमुख बँकांचे रात्रीत राष्ट्रीयकरण करून खासगी अर्थव्यवस्थेला जोरदार धक्का दिला होता. 

Web Title: 500, 1000 notes Banned