Coronavirus : देशात ५२, तर राज्यात 'या' ठिकाणी आहेत 'कोरोना टेस्ट लॅब'!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 मार्च 2020

महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी कोरोनाची अधिकृत चाचणी केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसचा फटका 100 हून अधिक देशांना बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतातही कोरोना पेशंटची संख्या वाढू लागली आहे. परिणामी, या व्हायरसचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी केंद्र सरकारतर्फे कोरोना तपासणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचा उल्लेख महामारी असा केला असून प्रत्येक देशाने आपापल्या परीने कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्र सरकारतर्फे देशभरातील सुमारे २३ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशा एकूण ५२ ठिकाणी तपासणी केंद्रे उभारली आहेत. कर्नाटकमध्ये सर्वाधिक ८ केंद्रे उभारण्यात आली आहेत. 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी कोरोनाची अधिकृत चाचणी केंद्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबईतील  कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्टिअस डिसीजेस या ठिकाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांची चाचणी करण्यात येत आहे. 

- मित्र, नातेवाईक विदेशात आहेत? कोरोनामुळं बदललेले व्हिसाचे नियम वाचा!

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभरात ५२ ठिकाणी उभारली तपासणी केंद्र

आंध्रप्रदेश -
१. श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, तिरुपती
२. आंध्र मेडिकल कॉलेज, विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश
३. जीएमसी, अनंतपूर

अंदमान आणि निकोबार बेटे - 
४. विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्र, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार

आसाम -
५. गुवाहाटी मेडिकल कॉलेज, गुवाहाटी
६. वैद्यकीय संशोधन केंद्र, दिब्रुगड

बिहार -
७. राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पटना

चंदीगड - 
८. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, चंदीगड

छत्तीसगड - 
९. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस, रायपूर

दिल्ली -
१०. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस, दिल्ली
११. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, दिल्ली

- 'मी मुख्यमंत्री होणार नाही, पण...'; थलायवा रजनीकांत बदलणार तमिळनाडूचं राजकारण!

गुजरात -
१२. बी. जे. मेडिकल कॉलेज, अहमदाबाद
१३. एम. पी. शहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जामनगर

हरयाणा - 
१४. पंडित बी. डी. शर्मा पोस्ट ग्रॅड्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, रोहतक, हरयाणा
१५. बीपीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोनीपत

हिमाचल प्रदेश - 
१६. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, शिमला, हिमाचल प्रदेश
१७. डॉ. राजेंद्र प्रसाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कांग्रा, तांडा, हिमाचल प्रदेश

जम्मू आणि काश्मीर -
१८. शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, श्रीनगर
१९. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जम्मू

झारखंड - 
२०. एमजीएम मेडिकल कॉलेज, जमशेदपूर

कर्नाटक -
२१. बेंगलोर मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, बेंगलोर
२२. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी फिल्ड युनीट बेंगलोर
२३. म्हैसूर मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर
२४. हस्सान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हस्सान, कर्नाटक
२५. शिवमोगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, शिवमोगा, कर्नाटक
२६. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी फिल्ड युनीट, केरळ
२७. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, थिरुवनंतपूरम
२८. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोझीकोड

मध्य प्रदेश -
२९. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस, भोपाळ
३०. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर

मेघालय -
३१. नेइग्री ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिकल सायन्सेस, शिलाँग, मेघालय

- शिवजयंती ३६५ दिवस व्हावी, आम्ही तिथीनुसारच करु - राज ठाकरे

महाराष्ट्र -
३२. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
३३. कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इन्फेक्टिअस डिसीजेस, मुंबई

मणिपूर -
३४. जे. एन. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटल, इंफाळ (पूर्व), मणिपूर

ओडिसा -
३५. विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्र, भुवनेश्वर

पुदुच्चेरी -
३६. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुदुच्चेरी

पंजाब -
३७. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पटियाला, पंजाब
३८. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमृतसर

राजस्थान -
३९. सवाई मानसिंग, जयपूर
४०. डॉ. एस. एन. मेडिकल कॉलेज, जोधपूर
४१. झलावर मेडिकल कॉलेज, झलावर, राजस्थान
४२. एस. पी. मेडिकल कॉलेज, बिकानेर, राजस्थान

तमिळनाडू -
४३. किंग्ज इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन अॅण्ड रिसर्च, चेन्नई
४४. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, थेनी

त्रिपुरा -
४५. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अगरताळा

तेलंगणा -
४६. गांधी मेडिकल कॉलेज, सिकंदराबाद

उत्तर प्रदेश -
४७. किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊ
४८. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
४९. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, अलिगढ

उत्तराखंड -
५०. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हल्दवाणी, नैनिताल

पश्चिम बंगाल -
५१. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अॅण्ड एन्टरिक डिसीज, कोलकाता
५२. इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (आयपीजीएमईआर), कोलकाता

No photo description available.

- देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 Testing labs in India working to curb the spread of Coronavirus