आंध्रप्रदेशात विषारी कीटकनाशके खाल्याने 56 गायी दगावल्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

विषारी कीटकनाशकांची फवारणी केलेल्या ज्वारीच्या पिके खाऊन सुमारे 56 गायी दगावल्या आहेत. ही घटना आंध्रप्रदेशातील डायदा गावात रविवारी रात्री उशीरा घडली. डायदा गावातील शेतकरी गुंतूर जिल्ह्यातील गुराझला येथे फिरण्यासाठी गेले असता ही घटना समोर आली. 

विजयवाडा : विषारी कीटकनाशकांची फवारणी केलेल्या ज्वारीच्या पिके खाऊन सुमारे 56 गायी दगावल्या आहेत. ही घटना आंध्रप्रदेशातील डायदा गावात रविवारी रात्री उशीरा घडली. डायदा गावातील शेतकरी गुंतूर जिल्ह्यातील गुराझला येथे फिरण्यासाठी गेले असता ही घटना समोर आली. 

नालगोंडा जिल्ह्यातील नेरेदचेरला गावात गुंडाला लक्षमय्या हे शेतकरी गायींना चरण्यासाठी फिरत होते. लक्षमय्या हे गायींना चरण्यासाठी गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या गावापासून गुरावाला येथे येत असायचे. रविवारी लक्षमय्या हे गायींना चरण्यासाठी येथे आले होते. विषारी कीटकनाशके फवारणी केलेली ही पिके या गायींनी खाल्ली. त्यामुळे या गायींना त्रास जाणवू लागला. यामध्ये 56 गायी दगावल्या. मात्र, या कळपामध्ये इतर 44 गायींचा समावेश होता. या गायींनीही पिके खाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात वेदना सुरु झाल्या. 20 गायींची माहिती मिळाली असून, 24 गायींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. 

Aushad favarani

आधीच कर्जबाजारीपणामुळे कंटाळलेल्या लक्षमय्या हे अत्यंत चिंतेत होते. त्यानंतर आता 56 गायींचा मृत्यू झाल्याने ते आणखीच चिंतेत आहेत. या गायींच्या मृत्युमुळे लक्षमय्या यांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.  

दरम्यान, लक्षमय्या यांच्या 18 वर्षीय प्रमिला या मुलीने याप्रकाराबद्दल राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. ''या घटनेमुळे माझ्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. आमचे संपूर्ण कुटुंब या गायींवर आधारित होते. माझ्या बहिणीचे लग्नही करण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. आम्हाला या कर्जातून मुक्त करण्यासाठी सरकारने आम्हाला मदत करावी''.

Web Title: 56 cows die after feeding on pesticides in Andhra village