तमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पहाटे तीनच्या सुमारास हे चक्रीवादळ तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळच्या किनाऱ्याला धडकले. 80 ते 90 किमी इतका या वादळाचा वेग असल्याने व धुवाधार पावसामुळे किनाऱ्यावरील भागाचे नुकसान झाले आहे. या पुढील 24 तासांत गज आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

चेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर गज या चक्रीवादळात झाले. यात कुड्डालोरमधील दोन व थंजावूरमधील चार अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.   

पहाटे तीनच्या सुमारास हे चक्रीवादळ तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळच्या किनाऱ्याला धडकले. 80 ते 90 किमी इतका या वादळाचा वेग असल्याने व धुवाधार पावसामुळे किनाऱ्यावरील भागाचे नुकसान झाले आहे. या पुढील 24 तासांत गज आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. या वादळाचा फटका तमिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल या भागांना बसला आहे. 

हे वादळ किनारपट्टीपर्यंत येताच तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली. नागपट्टनमा येथे मोठा पाऊस आणि वादळ सुरुच आहे. दरम्यान, गज चक्रीवादळ हे नागपट्टनमध्ये पोहोलचे आहे. किमान दोन तास हे चक्रीवादळ या भागात धडकले. दोन एक तासांत या चक्रीवादळात अनेक झाडे पडली आहेत. दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदत कार्यात सहभागी झाली आहेत.

तमिळनाडू सरकारने किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांमधील शाळांना गुरूवार व शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच तेथील दैनंदिन व्यवहारांप्रमाणेच वाहतूकही विस्कळीत झाली आहे. 

Web Title: 6 dies in gaja cyclone at Tamilnadu