भीषण अपघातात मुंबईचे सहा जण ठार

अमृत वेताळ
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

बेळगाव : लॉरी आणि आरामबसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात मुबंईचे सहा पर्यटक जण ठार झाले. तर 21 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे (ता.17) भद्रापूरनजीक (ता. अनिगेरी) जिल्हा धारवाड (कर्नाटक) येथे घडला आहे.

विश्वनाथ मेस्त्री (वय 76), सुमेधा जमखंडीकर (वय 65), रमेश जयपाल (वय 70), दिनकर मेस्त्री (वय 74), लहु केळकर (वय 65) आणि सुचित्रा राहुल (वय 65) सर्वजण रा। मुबंई अशी मृतांची नावे आहेत. तर बसमधीक 21 जण जखमी झाले आहेत. 19 जखमींना हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये तर तिघांना अनिगेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून हंपीला जात असताना बसला अपघात घडला. अपघाताची नोंद अनिगेरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: 6 dies from mumbai in accident near belgum