भारताने लसीकरणात ओलांडला 50 कोटींचा टप्पा

 corona vaccination
corona vaccinationEsakal
Summary

देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवारपर्यंत भारताने 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे.

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवारपर्यंत भारताने 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. गेल्या 20 दिवसांत 10 कोटी लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आहे. (corona vaccination Latest News)

पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करत देशाने लसीकरणात 50 कोटी डोस देण्याचा आकडा पार केल्याचं सांगितलं. कोरोना विरोधातील लढ्यात आपल पुढे जात आहोत. या संख्येत भविष्यात आणखी वाढ होईल. सर्व नागरिकांना #सर्वांनामोफतलस मोहीमंतर्गत लस मिळत असल्याचं मोदी म्हणाले. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस देण्यात आली.

 corona vaccination
काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

शुक्रवारपर्यंत 1.03 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लशीचा पहिला डोस मिळालाय, तर 79.51 लाख जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत. 1.8 कोटी फ्रंटलाईन वर्कर्संना पहिला डोस, तर 1.16 कोटी जणांना दुसरा डोस मिळालाय. 1 मार्चपासून 60 वर्षांपुढील आणि 45 वर्षांपुढील आजारी असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सरसकट नागरिकांना लसीकरण सुरु करण्यात आले. आकडेवारीनुसार, 60 वर्षांपुढील 7.8 कोटी लोकांना कोरोनावरील लशीचा पहिला डोस, तर 3.8 लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. 45 वर्षांपुढील 11.07 कोटी लोकांना पहिला, तर 4.19 कोटी लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

 corona vaccination
JEE Main 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल

1 मेपासून भारतात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार, 18-44 वयोगटातील 17.23 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 1.12 कोटी नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांनी 1 कोटींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com