उत्तर प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पोलिस आणि आपातकालीन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे.

पोलिस आणि प्रशासनच्या एका पथकाकडून जेसीबी मशिनच्या साहाय्याने ढिगारा हटवून बचावकार्य केले जात आहे. हा स्फोट उत्तर प्रदेशातील मिरेहची भागात झाला असून, या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आता बचाव पथकाकडून काम केले जात आहे. बचाव पथकाला आत्तापर्यंत 6 मृतदेह मिळाले तर 2 जण गंभीर जखमी आहे. 

Vidhan Sabha 2019 : विधानसभा प्रचारास मिळणार अवघे बारा दिवस

दरम्यान, यापूर्वी पंजाबमधील बटाला येथे फटाक्यांच्या कारखान्यात अशाचप्रकारे भीषण स्फोट झाला होता. यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता ही दुर्घटना घडली आहे.

शरद पवार म्हणतात, 'मला आता आणखी काही नको'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 peoples died in a blast at cracker factory in etah district of uttar pradesh