बोअरवेलमध्ये पडली 6 वर्षांची चिमुकली; मदतकार्य सुरु

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

बोअरवेलजवळ खेळत असताना ती तीस फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. सध्या तिला ऑक्सीजन पुरविण्यात येत असून, तिच्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत.

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील झुंजारवाडी येथे सहा वर्षांची चिमुकली 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली असून, शनिवारी रात्रीपासून बचावकार्य सुरु आहे.

बेळगावचे पोलिस अधिक्षक रवीकांत गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अथणी तालुक्यातील झुंजारवाडी येथील कावेरी हा सहा वर्षांची मुलगी शनिवारी सायंकाळी बोअरवेलमध्ये पडली. या मुलीच्या बचावासाठी पुण्याहून एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले आहे. या मुलीला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

बोअरवेलजवळ खेळत असताना ती तीस फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. सध्या तिला ऑक्सीजन पुरविण्यात येत असून, तिच्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: 6-Year-Old Stuck 30 Feet Deep In Karnataka Borewell, Rescue Operations On