काश्मीरमध्ये दुप्पट संख्येने जवान यंदा हुतात्मा!

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

श्रीनगर : भारतीय लष्कराने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जम्मू काश्मीरमध्ये दुप्पट भारतीय जवान गमावले आहेत. या वर्षात 15 डिसेंबरपर्यंत सीमेवर सातत्याने होणाऱ्या गोळीबारात तब्बल 60 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. 

श्रीनगर : भारतीय लष्कराने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जम्मू काश्मीरमध्ये दुप्पट भारतीय जवान गमावले आहेत. या वर्षात 15 डिसेंबरपर्यंत सीमेवर सातत्याने होणाऱ्या गोळीबारात तब्बल 60 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. 

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादी कारवाया वारंवार केल्यामुळे काश्मीरमध्ये तैनात असलेल्या 60 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले आहे.
2015 मध्ये भारतीय लष्कराच्या काश्मीरमधील हुतात्मा जवानांची संख्या 33 एवढी होती, तर 2014 मध्ये लष्कराच्या 32 जवानांना येथे हौतात्म्य आले होते. या वर्षी आतापर्यंत हा आकडा वाढून 60 एवढा झाला आहे. यातील 23 जवानांचा मृत्यू नियंत्रण रेषेवर झाला आहे. 2015 मध्ये नियंत्रण रेषेवर 4 जवान हुतात्मा झाले होते, तर 2014 मध्ये ही संख्या 5 एवढी होती.पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना, दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय जवानांना वीरमरण आले. 

पाकिस्तानच्या 'बॉर्डर ऍक्शन टीम'ने 2016 या वर्षात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत वारंवार गोळीबार केला. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठीही पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यावर्षी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना वीरमरण आलेल्या भारतीय जवानांची संख्या 37 आहे. 2015 मध्ये हा आकडा 29, तर 2014 मध्ये 27 इतका होता. उरी आणि नागरोटामधील हल्ल्यांमुळे यंदा भारतीय लष्कराने ३७ जवान गमावले. या दोन हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कराने 26 जवान गमावले आहेत, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

Web Title: 60 soldiers killed this year, double annual toll in last 2 years