बलात्कार केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून केले हे कृत्य....

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

गोदावरी जिल्ह्यातील छेरूवू गट्टू गावामध्ये 60 वर्षाच्या वृद्ध महिलेवर शेजारी राहणाऱया 31 वर्षाच्या नागरिकाने बलात्कार करून खून केल्याची घटना घडली आहे.

काकिनदा (आंध्र प्रदेश): गोदावरी जिल्ह्यातील छेरूवू गट्टू गावामध्ये 60 वर्षाच्या वृद्ध महिलेवर शेजारी राहणाऱया 31 वर्षाच्या नागरिकाने बलात्कार करून खून केल्याची घटना घडली आहे.

वृद्ध महिलेवर बलात्कार करून खून केल्यानंतर आपली ओळख पटू नये म्हणून त्याने वृद्ध महिलेच्या अंगावर व घरामध्ये मिरची पावडर टाकली होती. मिरची पावडरीमुळे पोलिसांच्या श्वानाला माग काढता येत नव्हता. पण, पोलिसांनी छडा लावत काही तासांमध्येच शेजारी राहणाऱयाला ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक अदनान नयीम अस्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम सुरू असताना नागरिक सुब्रमण्यम मंदिरात गेले होते. यावेळी महिलेच्या शेजारी राहणाऱयाने महिलेवर बलात्कार करून खून केला व घरातून जाताना मिरची पावडर टाकून 80 हजार रुपये घेऊन पळून गेला. सीसीटीव्ही व इतर माहितीच्या अधारे बलात्कार करणाऱयाचा शोध लागला व त्याला अटक केली. न्यायालयीन आदेशामुळे त्याचे नाव जाहिर केले नाही. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पीडित महिला घरामध्ये एकटीच राहात होती. काही वर्षांपूर्वी तिचा पती व मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलगी हैदराबाद येथे राहात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 year old widow raped and killed by 31 year old neighbour in ap