गुजरातमध्ये 600 किलो गांजा जप्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 जून 2018

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने दक्षिण गुजरातच्या भरुचमधून 600 किलो गांजा जप्त केला असून, बाजारपेठेत त्याची किमत ही दोन कोटी इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
 

अहमदाबाद : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने दक्षिण गुजरातच्या भरुचमधून 600 किलो गांजा जप्त केला असून, बाजारपेठेत त्याची किमत ही दोन कोटी इतकी आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री भरूचमध्ये गांजाने भरलेला ट्रक जप्त केला, असे अहमदाबाद विभागाचे अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे संचालक हरिओम गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गांधी म्हणाले, की ओडीशामधून हा गांजा पाठविण्यात आला असून, तो राज्याच्या विविध भागांत वितरित करण्यात येणार होता. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रमोदकुमार आणि शीश पाल अशी त्यांची नावे असून, ते दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत, असे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: 600 kg of ganja seized in Gujarat