सुनेशी अनैतीक संबंधातून त्याने केले तुकडे-तुकडे

62 year old man kills son and want ‘to marry daughter in law at punjab
62 year old man kills son and want ‘to marry daughter in law at punjab

फरिदकोट (पंजाब): सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधामध्ये मुलाचा अडथळा येत असल्याने मुलाचा खून केला. मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून बाहेर फेकून देत असताना पकडला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदकोट जिल्ह्यातील डाबरी खाना या गावातील छोटा सिंह (वय 62) हा त्याच्या मुलांसोबत राहतो. छोटा सिंहचा मोठा मुलगा राजविंदर सिंह 40 वर्षांचा. राजविंदरचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. छोटा सिंहचे राजविंदरच्या पत्नीशी म्हणजे सुनेशी अनैतिक होते. यामध्ये राजविंदरचा अडथळा ठरत होता. यामुळे छोटा सिंहने सुनेसाठी फरिदकोट शहरामध्ये घऱ भाड्याने घेतले होते. सुनेशी विवाह करुन या घरात राहायला जाण्याचा निर्णय त्याने घेतला.

दरम्यान, सासरा व सुनेमधील अनैतिक संबंधाची माहिती कुटुंबीयांनी समजली. कुटुंबियांनी समजून सांगितल्यानंतरही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. राजविंदर मंगळवारी (ता. 12) घरामध्ये झोपला असताना छोटा सिंहने मुलावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. यामध्ये राजविंदरचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर त्याने मृतदेहाचे बारीक तुकडे-तुकडे केले आणि एका मोठ्या पिशवीत भरले. पिशवी घराबाहेर फेकायला जात असताना पिशवीवरील रक्ताचे डाग लहान मुलाने पाहिले व त्याबाबत विचारणा केली. यावेळी राजविंदरची हत्या केल्याचे उघड झाले. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, छोटा सिंहला अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com