राजपथावर लष्करी सामर्थ्याचे, सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

यंदाच्या पथसंचलनात युएईचे सैन्यही सहभागी झाले होते. 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पथसंचलनाला सुरवात झाली. एनएसजी व ब्लॅक कॅट कमांडोज प्रथमच सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (गुरुवार) राजपथावर झालेल्या पथसंचलनात लष्करी सामर्थ्याचे व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविण्यात आले. यंदा प्रथमच एनएसजी आणि ब्लॅक कॅट कमांडो पथसंचलनात सहभागी झाले होते.

इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे हुतात्मा जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ध्वजारोहण करुन तिरंग्याला सलामी दिली. या कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) युवराज शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यंदाच्या पथसंचलनात युएईचे सैन्यही सहभागी झाले होते. 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पथसंचलनाला सुरवात झाली. एनएसजी व ब्लॅक कॅट कमांडोज प्रथमच सहभागी झाले होते. यासह संपूर्ण देशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच संचलनात सहभागी झाले. तेजसशिवाय स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि रुद्रही सादर करण्यात आली.

विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांनी उपस्थितांची मने जिंकली. तर, जवानांनी दुचाकीवर केलेल्या चित्तथरारक कसरती सादर केल्या. 

Web Title: 68th Republic Day celebrations: In a first, UAE soldiers, NSG commandos march in parade