रायबरेलीजवळ एक्स्प्रेसचे पाच डबे घसरले; 7 जणांचा मृत्यू

raibareli
raibareli

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळील हरचंदपूर स्टेशनजवळ आज (बुधवार) सकाळी न्यू फरक्का एक्स्प्रेसचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून, 35 जण जखमी झाले.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एनडीआरएफ आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घसरलेले डबे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. मृतांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लखनौ आणि वाराणसीहून अधिक पथके याठिकाणी पोहचली आहेत.

रायबरेलीचे पोलिस अधीक्षक सुजाता सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून, 35 हून अधिकजण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दीनदयाल उपाध्याय जंक्शनवरील हेल्पलाइन नंबर
BSNL: 05412-254145
रेल्वे : 027-73677

एमरजन्सी हेल्पलाईन नंबर
BSNL: 0612-2202290, 0612-2202291, 0612-220229
रेल्वे : 025-83288

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com