पश्‍चिम बंगालमध्ये वीज कोसळून सात मृत्युमुखी

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

पश्‍चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनेमध्ये सात जण मरण पावले, तर नऊहून अधिक जण जखमी झाले. वीज कोसळण्याच्या घटनेनंतर आज सकाळी मुसळधार पाऊस झाला, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वीज कोसळण्याच्या घटनेमध्ये नादिआ जिल्ह्यात चार जण, उत्तर 24 परगणा जिल्ह्यात दोन जण मरण पावले. वीज कोसळल्यामुळे बांकुरा जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळण्याच्या घटनेमध्ये सात जण मरण पावले, तर नऊहून अधिक जण जखमी झाले. वीज कोसळण्याच्या घटनेनंतर आज सकाळी मुसळधार पाऊस झाला, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वीज कोसळण्याच्या घटनेमध्ये नादिआ जिल्ह्यात चार जण, उत्तर 24 परगणा जिल्ह्यात दोन जण मरण पावले. वीज कोसळल्यामुळे बांकुरा जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

विजेच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस पडला आणि जोरदार वादळी वारे वाहण्यास सुरवात झाली, असे बांकुरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नादिआ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ही छाप्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. एप्रिलपासून वीज कोसळण्याच्या घटनेमध्ये 25 हून अधिक जण राज्यात मरण पावले आहेत. 

Web Title: 7 dead in storm, lightning in West Bengal

टॅग्स