धुक्यामुळे झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली- हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हरयाणातील अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. याआधीही हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला होता.

Web Title: 7 Killed 4 Injured in Accident Due to Heavy Fog in Haryana