
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
मथुरा : यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, वॅगन आर कारचा अक्षरक्षः चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील तीन पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू झाला. माईल स्टोन 68 जवळ ही घटना घडली. (Mejor Road Accident On Yamuna Express Way)
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक हरदोई येथून नोएडा येथे एका लग्नाला जात होते. त्यावेळी कॉल रायडर्स माइलस्टोन 68 जवळ गाडी पोहोचली असता, एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
पीएम मोदी आणि सीएम योगींकडून शोक व्यक्त
मथुरेतील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. यासोबतच मी जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही कामना करतो अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या अपघातानंतर शोक व्यक्त केला असून, जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Web Title: 7 Killed In Road Accident On Yamuna Expressway In Mathura
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..