जम्मू काश्मीरमध्ये चकमक; 7 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

टीम ई-सकाळ
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- पाकिस्तानच्या 5 ते 7 सैनिकांचा करण्यात आला खात्मा. 

जम्मू : भारतीय लष्करातील जवान आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या 36 तासांपासून चकमक सुरु आहे. ही चकमक केरन सेक्टरमध्ये सुरु असून, या चकमकीत पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीमच्या 5 ते 7 सैनिकांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, लष्कराने हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. केरन सेक्टरमध्ये गेल्या काही तासांपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत 5-7 सैनिकांचा खात्मा करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले. या सर्व सैनिकांचे मृतदेह सध्या सीमारेषेवर पडले आहेत. हा गोळीबार सुरु असल्याने त्यांचे मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 Pakistani BAT Killed in Encounter in Jammu and Kashmir