उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

देहरादून : उत्तराखंडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस येत असल्याने राज्यातील काही शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. देहरादून शहर आणि जवळच्या परिसरात 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच नाचनीमध्ये रामगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूल वाहून गेला. 

आज (बुधवार) सकाळी साडेपाचच्या सुमारास देहरादूनच्या वसंत विहारला नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती मिळाली, की शास्त्रीनगरच्या खाला परिसरातील एका घरातील काही जण घरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वसंत विहार पोलिसांनी आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. 

पोलिसांनी या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 6 जणांना बाहेर काढले. यातील 4 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच राज्याच्या काही भागातून 3 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे. 

Web Title: 7 people die due to heavy rains in Uttarakhand