उत्तरप्रदेशात 7 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

उत्तरप्रदेशातील एका लग्नसमारंभादरम्यान 19 वर्षीय आरोपी सोनूने कुटुंबातील इतर लोक लग्नात व्यस्त असताना पीडित बालिकेला बांधकाम सुरु असलेल्या एका खोलीत नेले आणि तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराची ही घटना उघडकीस येऊ नये. यासाठी त्याने त्या बालिकेची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 

लखनौ : उत्तरप्रदेशात सात वर्षीय बालिकेवर एका 19 वर्षीय नराधमाकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या नराधमाने बलात्कारानंतर पीडित बालिकेची हत्या केली. ही घटना उत्तरप्रदेशातील इटाह येथे एका लग्न समारंभादरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

rape

जम्मू काश्मीरच्या कठुआ येथील बलात्कार आणि हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. उत्तरप्रदेशातील एका लग्नसमारंभादरम्यान 19 वर्षीय आरोपी सोनूने कुटुंबातील इतर लोक लग्नात व्यस्त असताना पीडित बालिकेला बांधकाम सुरु असलेल्या एका खोलीत नेले आणि तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्काराची ही घटना उघडकीस येऊ नये, यासाठी त्याने त्या बालिकेची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, ही सात वर्षीय बालिका येथील एका लग्नसमारंभासाठी इटाह शहरातील गल्ला मंडी येथे सोमवारी रात्री उशीरा आली होती. मात्र, लग्नसमारंभ होऊनही ती कोणालाही न दिसल्याने तिच्या कुटुबियांनी तिचा शोध घेण्यास सुरु केला. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी तिचा मृतदेह आढळला. त्यानंतर आरोपी सोनूला घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली, असे कोटवलीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पंकज मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: 7 year old girl raped killed during wedding in Uttar Pradeshs Etah Crime