70 वर्षीय अंध महिलेवर घर मालकाकडून अत्याचार! आरोपी फरार : Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: 70 वर्षीय अंध महिलेवर घर मालकाकडून अत्याचार! आरोपी फरार

नवी दिल्ली : एका ७० वर्षीय वृद्ध अंध महिलेवर घर मालकाकडून बलात्कार करण्यात आल्याचा लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. हे कृत्य केल्यानंतर आरोपी घरमालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पीडित महिलेनं आपल्या नातेवाईकासह पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. झारखंडमधील धनबाद इथं ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजधानी रांचीपासून १७० किमी अंतरावर असलेल्या धनबाद जिल्ह्यातील सुदामदी भागात सोमवारी ही घटना घडली. यावेळी पीडित अंध महिला घरात एकटीच होती. त्यावेळी या नराधमानं तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. ७० वर्षीय पीडित अंध महिला पूर्वी ५५ वर्षीय आरोपीच्या घरात भाड्यानं राहत होती. त्यामुळं आरोपी तिच्यासह तिच्या कुटुंबाला ओळखत होता.

हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

दरम्यान, या घटनेनंतर पीडित महिलेनं आपल्या मुलासह सुदामदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलीस इनचार्ज प्रदीप राणा यांनी त्यांचा जबाब घेतला. तसेच याचा तपास सुरु करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी एक पथकही नमण्यात आलं आहे.

टॅग्स :Crime NewsDesh news